मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांनी विश्वेश्वरय्या नगर येथें बेळगाव स्मार्ट सिटी प्रोजेक्ट मधील आता पर्यंतच्या सर्वात महत्वाच्या प्रोजेक्टचे उदघाटन केलं.राज्यात हे पाहिलं वाहील कंट्रोल कमांड सेंटर आहे या केंद्रात काय काय असणार आहे याची माहिती सर्व सामान्य जनतेला नाही ते आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात
शहरातील कचऱ्याची उचल केली जाते की नाही,पाणी पुरवठा,पथदीप,शहरातील प्रदूषणाची पातळी यासह अनेक बाबीवर कमांड आणि कंट्रोल केंद्रात बसून लक्ष ठेवले जाणार आहे.शहरातील रहदारी काशी आहे,कोठे वाहतुकीची कोंडी झाले हे देखील या सेन्टर मधून बघितले जाणार आहे.त्यामुळे जनतेच्या समस्यांचे त्वरित निराकरण होण्यास मदत होणार आहे.
शहरात बसवण्यात आलेल्या स्मार्ट पोलवर तापमान,रहदारीची स्थिती तेथील जनतेला समजणार आहे.या पोलवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार असून त्याद्वारे लक्ष ठेवले जाणार आहे.महिलांना त्वरित मदत मिळण्यासाठी एक पॅनिक बटण बसविले असून हे बटण दाबल्यावर लगेच मदत उपलब्ध होणार आहे.
नऊ स्मार्ट पोल बसवणार-
बेळगाव स्मार्ट सिटी लि कंपनी आता शहरात नऊ ठिकाणी स्मार्ट पोल बसविण्याचा निर्णय घेतला असून या स्मार्ट पोलमुळे जनतेला विविध प्रकारची माहिती मिळणार आहे.
या पोलवर एक इमर्जन्सी बटण असणार असून हे बटण दाबल्यास तत्काळ संदेश कमांड कंट्रोल सेंटरला जाईल आणि लगेच पोलिसांना तो संदेश पाठवला जाणार आहे.या पोलवर मोठे एल ई डी स्क्रीन लावण्यात येणार असून त्यावर वाहतुकीची माहिती आणि अन्य जनतेला उपयुक्त माहिती दाखविण्यात येईल.
ट्रॅफिक जॅम असेल तर त्याची माहिती स्क्रीनवर येईल त्यामुळे वाहनचालक आपण कोणत्या मार्गाने जायचे याचा निर्णय घेऊ शकतील.हवा कशी आहे,आर्द्रता किती आहे,तापमान किती आहे याची माहितीही पोलवर दिली जाणार आहे.
या पोलवरून शहरातील हॉटस्पॉट देखील नियंत्रित केले जाणार आहेत.राणी चन्नमा सर्कल,कृष्णदेवराय सर्कल,अशोक सर्कलधर्मवीर संभाजी चौक,गोगटे सर्कल,बसवेश्वर सर्कल,नाथ पै सर्कल,आर पी डी क्रॉस आणि मंडोळी रोड येथे हे स्मार्ट पोल बसविण्यात येणार आहेत.