Wednesday, April 24, 2024

/

रमेश यांचा पुनरुच्चार ग्रामीण मराठ्यांचेच!

 belgaum

विखुरलेल्या मराठ्यांना एकत्र करूच असा निर्धार गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी यांनी केला आहे.ग्रामीण वर मराठयांचा हक्क अशी भूमिका मांडणाऱ्या रमेश जारकीहोळी यांना मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आणि कन्नड संघटने कडून पुतळे जाळले तरी काहीच फरक पडताना दिसत नाही त्यांनी पुन्हा एकदा मराठयांना एकत्र करून ग्रामीण वर मराठ्यांचे प्राबल्य आहे असे म्हणत आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे सूचित केले आहे.

बेळगाव ग्रामीण मतदार संघ मराठी भाषिकांचा बालेकिल्ला आहे याठिकाणी मराठ्यांचेच प्राबल्य आहे असे जाहीर वक्तव्य करणाऱ्या आमदार रमेश जारकीहोळी यांनी आपल्या या मताशी ठाम राहात त्याचा पुनरुच्चार केला या शिवाय आता विस्कळीत झालेल्या मराठ्यांना आपण संघटित करणार असल्याचे जाहीर केले आहे. या त्यांच्या आगीतील तेल ओतणाऱ्या वक्तव्यामुळे कन्नड संघटना खवळून उठल्या आहेत.

बेळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर आणि गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी यांच्यातील वाद अलीकडच्या काळात चर्चेचा विषय झाला आहे. आगामी निवडणुकांमध्ये आपण आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांना त्यांची जागा दाखवून देऊ, त्यांना पराभूत करण्यासाठी वेळप्रसंगी 5 कोटी रुपये खर्च करू असे कांही दिवसापूर्वी आमदार रमेश जारकीहोळी यांनी जाहीरपणे सांगितले होते. तत्पूर्वी बेळगाव ग्रामीण मतदार संघ मराठी भाषिकांचे वर्चस्व असणारा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात मराठ्यांचे प्रभुत्व आहे असे जाहीर वक्तव्यही आमदार जारकीहोळी यांनी केले होते. जारकीहोळी यांच्या या वक्तव्यामुळे खुद्द मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा हे तर नाराज झालेच शिवाय सीमाभागातील कन्नड संघटना संतप्त झाल्या. कर्नाटक रक्षण वेदिकेच्या सारख्या कन्नड संघटनांनी आमदार रमेश जारकीहोळी यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे, तसेच गेल्या चार दिवसापासून करवे संघटनेतर्फे यासंदर्भात आंदोलनही केले जात आहे.

 belgaum

दरम्यान, आपल्या विरुद्ध इतके रान पेटलेले असताना आमदार रमेश जारकीहोळी यांनी आता त्यामध्ये आणखी भर घातली आहे. बेळगाव ग्रामीण मतदारसंघात मराठ्यांचे प्राबल्य असल्याच्या आपल्या मताशी आपण ठाम आहोत असे त्यांनी सांगितले आहे. शिवाय त्यात भर घालताना ‘या मतदार संघातील मराठी भाषिक विस्कळीत झाले आहेत आणि त्यांना आपण संघटित करून त्यांच्यात एकजूट निर्माण करणार आहोत’, असे खळबळजनक वक्तव्य आता त्यांनी केले आहे. परिणामी कर्नाटक रक्षण वेदिकेसह समस्त कन्नडीग संघटनांचा संतापाने तिळपापड उडाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.