जनता दलचे माजी आमदार एन एच कोणरेड्डी यांनी बेळगाव व उत्तर कर्नाटकाला कर्नाटक सरकारकडून सावत्रभाव वागणूक मिळत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे .
सरकारने उत्तर कर्नाटकाच्या विकासाकडे दुर्लक्ष करून सर्व प्रकारचा विकास दक्षिण कर्नाटकातच केला त्यामुळे कर्नाटक राज्याच्या विभाजनाचा मुद्दा पुढे येत आहे. जर कर्नाटकाने उत्तर कर्नाटका कडे लक्ष दिले असते तर हा मुद्दा आलाच नसता असे. रेड्डी यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे.
बुधवारी उत्तर कर्नाटक विभागात असलेल्या सावत्र भावाबद्दल ते बोलत होते .
कर्नाटक ही जर सगळ्यांची आई असेल तर त्यांनी सर्व विभागातील जनतेकडे आपल्या मुलाप्रमाणे बघितले पाहिजे. मात्र कर्नाटक सरकार उत्तर कर्नाटकाकडे तसे पाहत नाही. सावत्र आई ज्याप्रमाणे आपल्या सावत्र मुलाकडे दुर्लक्ष करते तसाच प्रकार इथे सुरू असून त्यामुळे जनतेमध्ये नाराजी आहे. सरकारने स्थानिक असमतोल दूर करण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. असे त्यांनी म्हटले आहे. दरवर्षी कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन बेळगावात होत होते .मात्र यावेळी बंगलोर मध्ये ठेवण्यात आले आहे. सरकारी कार्यालय बेळगाव मध्ये हलवणे गरजेचे आहे.
मात्र विधानसभा अधिवेशन झाले तर राज्य स्तरावरचे अधिकारी तरी येत होते. आणि समस्या मिटत होत्या. पण यावेळी तेही नाही. त्यामुळे आता नागरिकांनी बघायचे कुणाकडे असा प्रश्नही त्यांनी केला आहे.
कर्नाटक सरकारला त्यांनी आपल्या विधानातून एक प्रकारे घरचा आहेर दिला आहे