Friday, April 26, 2024

/

शहापुरात युवकावर प्राणघातक हल्ला

 belgaum

तिघांनी धारधार शस्त्राने हल्ला केल्याने कपडे दुकानदार युवक गंभीर जखमी झाला आहे.बुधवारी रात्री नऊच्या दरम्यान विठ्ठलदेव गल्ली कॉर्नर शहापूर येथे घटना घडली आहे.
अभिजित भातकांडे वय 39 रा.पाटील मळा बेळगाव असे या हल्ल्यात जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार अभिजीत हे काही कामा निमित्त विठ्ठलदेव गल्ली शहापूर येथे गेले असता तिघा अज्ञातांनी अभिजित यांच्यावर धारधार शस्त्राने हल्ला केला त्यात अभिजित यांच्या हाताला आणि गालाला मोठी जखम झाली  आहे लागलीच त्याला उपचारासाठी के एल ई इस्पितळात दाखल करण्यात आले असून त्याची तब्येत सुधारत आहे.

Abhijeet bhatkande
Abhijeet bhatkande injured youth

अभिजित हे व्हाईट कॉलर नामक किर्लोस्कर रोड येथे रेडी मेड कपड्याचे दुकान चालवतात याशिवाय रियल इस्टेट व्यवसाय करतात.नेमकं कोणत्या कारणाने हल्ला झाला याबाबत माहिती मिळू शकली नाही.

 belgaum

घटनास्थळी शहापूर पोलीस निरीक्षक राघवेंद्र हवालदार यांनी पहाणी केली तर मार्केट ए सी पी एन व्ही भरमनी यांनी इस्पितळात जाऊन जखमीची चौकशी केली.या प्रकरणी शहापूर पोलिसात गुन्हा नोंद झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.