Wednesday, May 1, 2024

/

बस मधून पडल्याने शाळकरी विद्यार्थी ठार

 belgaum

शाळेला जाण्यासाठी बस मध्ये चढताना पडल्याने बसच्या टायरखाली सापडून दहा वर्षीय बालक ठार झाल्याची घटना देसुर येथे घडली आहे. राज्य परिवाहन मंडळाने शाळेसाठी सुरू केलेल्या बस रिव्हर्स घेतेवेळी गुरुवारी सकाळी साडे आठच्या दरम्यान ही घटना घडली आहे.

रिजवान न्याहमत चौधरी वय 10 रा.देसुर असे या अपघातात ठार झालेल्या बालकाचे नाव असून तो पिरनवाडी येथील डीवाइन मर्सि शाळेत पाचवीत शिकत होता.

Rizwan accident
Rizwan accident

सदर मुलगा पिरनवाडी येथील डीवाईन मर्सि शाळेत शिकत होता गुरुवारी सकाळी त्याचे आजोबा त्याला देसुर बस स्थानकाजवळ सोडायला आले होते.शाळेला जाणाऱ्या बस मध्ये चढल्यावर गाडी रिव्हर्स घेतेवेळी तो पडून टायरखाली आली त्यातच घटनास्थळी त्याचा मृत्यू झाला.त्याला शाळेला जायला सोडायला गेलेल्या आजोबाच्या समोरच ही घटना घडली.शाळकरी मुलाचा अपघातात दुर्दैवी अंत झाल्याने देसुर गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.घटनास्थळी ग्रामीण पोलिसांनी भेट देऊन पहाणी केली या प्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलिसांत  गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

 belgaum

शाळकरी मुलांना घेऊन जाणाऱ्या बस मध्ये नेहमी गर्दी होतच असते त्यातच मुलांना सांभाळून घेऊन जाण्याची जबाबदारी राज्य परिवाहन मंडळाच्या चालक व वाचकांची बनली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.