महाद्वार रोड संस्कृतिक कमिटीतर्फे आयोजित संजय कडोलकर डान्स कॉम्पिटिशन 2019 या भव्य बक्षीस रकमेच्या खुल्या नृत्य स्पर्धा उद्या शनिवारी 4 जानेवारीपासून 8 जानेवारी पर्यंत होणार आहे.गेल्या आठवड्यात काही कारणावास्तव पुढे ढकलण्यात आली होती आता शनिवार पासून घेतली जाणार आहे.
महाद्वार रोड येथील धर्मवीर संभाजी उद्यान मैदानावर सलग चार दिवस 4 जानेवारी पर्यंत दररोज सायंकाळी सहा ते रात्री 10.30 वाजेपर्यंत या स्पर्धेचे आयोजन केले जाणार असे कळवण्यात आले आहे.
या स्पर्धेसाठी तब्बल दोन लाख 51000 एकशे अकरा रुपयांचे बक्षीसे पुरस्कृत करण्यात आली आहेत स्पर्धेतील खुल्या डान्स गटातील पहिल्या तीन क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे 55 555, 22 222 व 11 111 रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. या व्यतिरिक्त अन्य विविध गटातील पारितोषिकाची रक्कम पुढील प्रमाणे आहे. सोलो डान्स (सीनियर)- 21000, 11000, 7000 रू. सोलो डान्स (ज्युनियर)- 10000, 5000, 3000 रू. भरतनाट्यम नृत्य- 10000, 5000, 3000 रू. ड्यूएट डान्स- 11000, 5000, 3000रू. माॅम डान्स- 5000, 3000, 2000रू. फॅन्सी ड्रेस सोलो- 2001, 1001, 501 रुपये.
संजय कडोलकर डान्स कॉम्पिटिशनचा यंदाचा हा 5 वा सीझन असून संभाजी उद्यानात या स्पर्धेची जोरदार तयारी करण्यात आली आहे आतापर्यंत या स्पर्धेत बेळगाव सह परगावच्या सुमारे 100 हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला आहे. सदर स्पर्धेसाठी 100 रुपये प्रवेश शुल्क असून स्पर्धकांनी आपल्या समवेत आयडेंटी कार्ड साईज फोटो व आधार कार्ड आणणे जरुरीचे आहे.