तुरमुरी कचरा डेपोच्या विस्तारीकरणाला विरोध करण्यासाठी शेकडो ग्रामस्थांनी दोन तास रास्ता रोको करून वाहतूक रोखून धरली. तुरमुरी येथे काही वर्षापूर्वी कचरा डेपो सुरू करण्यात आला आहे.यावेळी देखील ग्रामस्थांनी विरोध केला होता.आता या कचरा डेपोची क्षमता 100 टन आहे.ही क्षमता 450 टन इतकी वाढवण्यासाठी आणखी जमीन संपादन करण्याचा जिल्हा प्रशासनाचा इरादा आहे.
यासाठी तुरमुरी ग्रामस्थांच्या भावना जाणून घेण्यासाठी महानगरपालिकेचे आणि प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अधिकारी आले होते.पण ग्रामस्थांनी त्यांना परत पाठवले.कोणत्याही परिस्थितीत कचरा डेपो विस्तारीकरण होऊ देणार नाही असा निर्धार तुरमुरी ग्रामस्थांनी केला आहे.
रस्त्यावरील लढाई सोबत कायदेशीर लढाई देखील लढण्याची गरज असून जनहित याचिका दाखल करु व तुरमूरी ग्रामस्थांना न्याय देण्याचा प्रयत्न करू असे मत समिती नेते भाऊ गडकरी यांनी यावेळी व्यक्त केले.
राजकारण्यांना मुभा सामान्यांची अडवणूक
रस्ता रोको आंदोलन सुरू असताना आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या महिला लोक प्रतिनिधींने महाराष्ट्रातील दोघे आमदार आंदोलन स्थळा वरून जात होते त्यावेळी त्यांची गाडी न अडवता त्यांना सोडण्यात आले मात्र सामान्य माणसांची फरफट केली. आंदोलना वेळी सामान्यांना एक न्याय तर राजकारण्यांना एक न्याय का?असा सवाल देखील विचारण्यात आला.
सध्या तुरमुरी कचरा डेपो शिफ्ट करण्यासाठी आंदोलन करत असताना सर्वांनी राजकारण न करता तुरमुरी ग्रामस्थांना न्याय देण्याची गरज आहे मात्र राष्ट्रीय पक्षातील नेत्यां कडून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत यातील राजकारण बंद करून कचरा डेपो मुळे पीडित असलेल्या ग्रामस्थांना न्याय द्यावा अशी मागणी केली जात आहे.