Thursday, January 23, 2025

/

तौसिफच्या मृत्यूची चौकशीची मागणी

 belgaum

आपल्या मुलाने आत्महत्या केली नसून त्याचा घातपात घडविण्यात आला आहे.पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी तौसिफ इम्तियाज नाईक याच्या कुटुंबीयांनी जिल्हा पोलिस प्रमुखाकडे केली आहे.

अमन नगर मधील तौसिफ हा 14 नोव्हेंबर पासून बेपत्ता झाला होता.18 नोव्हेंबररोजी चार दिवसांनी त्याचा मृतदेह शिरूर धरणात सापडला.18 नोव्हेंबर रोजीच तौसिफचे लग्न होणार होते.

Tousif aman nagar
Tousif aman nagar

तौसिफने आत्महत्या केली नाही.त्याच्यावर कोणतेही दडपण नव्हते.त्यामुळे त्याचा खून करून मृतदेह धरणात टाकण्यात आला असावा असा संशय तौसिफचे आई,वडील आणि कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.

तौसिफच्या मृत्यूची चौकशी करून आम्हाला न्याय द्या अशी मागणी जिल्हा पोलिस प्रमुखाकडे तौसिफच्या कुटुंबीयांनी केली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.