कडोली येथे मोठ्या थाटामाटात 1 एकर जागेमध्ये मोठा गाजावाजा करून बीएसएनएल कार्यालय करण्यात आले. मात्र आता ही जागा केवळ शोभेची वस्तू बनून राहिली आहे. बेळगाव परिसरात बीएसएनएल बाबत कुणी रेंज देता का रेंज अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे ग्राहक आतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
मागील आठवडाभरापासून बीएसएनएलचा हा आंधळा कारभार सुरु असताना देखील याकडे कोणत्याही अधिकाऱ्याने लक्ष दिले नाही. मात्र ग्राहकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत असून बीएसएनएलचे कार्यालय कशासाठी ग्राहकांना योग्य सुविधा नसल्या तर हे कार्यालय घेऊन काय करायचे असा सवाल व्यक्त करण्यात येत आहे.
एकीकडे बीएसएनएलचे वरिष्ठ अधिकारी आता आपली कार्यालय कात टाकत असून नवनवीन सुविधा उपलब्ध करून देण्यात पुढाकार घेत आहेत असे सांगत असताना दुसरीकडे ग्रामीण भागातील अवस्था वेगळीच आहे. मागील आठवडाभरापासून येथे ते रेंज नसल्याने अनेक ग्राहक आतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र याचे सोयरसुतक संबंधित अधिकाऱ्यांना नसल्याचे दिसून येत आहे.
कडोली येथे बीएसएनएल कार्यालय व टावर असून देखील ही अवस्था आहे तर इतर भागात काय असा संतप्त सवाल उपस्थित करण्यात येत आहे. कोणताही अर्जंट कॉल करायचा असेल तर रेंज नसल्याने अनेक ठिकाणी भटकंती करावी लागत आहे. अशी अवस्था राहिली तर येथे कार्यालय कशासाठी सुरु करावे ते करायला बंद करावे असे संतापजनक प्रतिक्रिया ही उडत आहेत. त्यामुळे यापुढे तरी बीएसएनएल अधिकाऱ्यांनी ग्राहकांना सुरळीत सेवा द्यावी अशी मागणी होत आहे.