पुरग्रस्तांसाठी सरकारने निधी दिलेला आहे.निधींबाबत कोणतीही काटकसर सरकारने केली नाही.असे असताना पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी बेजबाबदार पणे का वागत आहेत?असा सवाल जिल्ह्याचे पालकमंत्री जगदीश शेट्टर यांनी उपस्थित केला.कामचुकार आणि बेजबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई करा असा स्पष्ट आदेश जगदीश शेट्टर यांनी जिल्हाधिकारी बोमनहळ्ळी यांना बजावला.पूरग्रस्तांना मदत करण्यात कामचुकारपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना शेट्टर यांनी चांगलेच सुनावले.
सुवर्णसौध मध्ये आयोजित केडीपी बैठकीत मंत्री जगदीश शेट्टर यांनी 2019-2020 सालातील तिसऱ्या बैठकीत विकासकामांचा आढावा घेतला.बैठकीला रेल्वेमंत्री सुरेश अंगडी,खासदार अण्णा साहेब जोल्ले,मंत्री शशिकला जोल्ले,जिल्हाधिकारी एस बी बोमनहळ्ळी, पोलीस आयुक्त लोकेशकुमार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सुवर्णसौधमध्ये बैठक सुरू असताना शेतकऱ्यांनी शंभर टक्के कर्जमाफी करा मागणीसाठी भर उन्हात धरणे आंदोलन छेडले होते.पोलिसांनी शेतकऱ्यांना शेट्टर यांची भेट घेण्यास अडवल्यामुळे पोलीस आणि शेतकऱ्यात शाब्दिक चकमक झडली.