संघर्ष हा बेळगावातील शेतकऱ्यांच्या पाचवीला पुजलेला आहे.रिंग रोड असो हलगा मच्छे बायपास असोत किंवा कणबर्गी भु संपादन असो शेतकऱ्यांना संघर्ष करावाच लागत आहे.
बेळगाव नगराभिवृद्धी प्राधिकरण शेतकऱ्यांना भीती घालून ,दडपण आणून कणबर्गी येथील पिकाऊ जमीन गृहनिर्माण योजनेसाठी घेत असल्याचा आरोप कर्नाटक रयत संघ आणि हसिरू सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.जमीन संपादन करू नये यासाठी शेतकरी आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बुडा कार्यालया समोर धरणे धरले.
अवैज्ञानिक पद्धतीने शेतकऱ्यांची जमीन संपादित केली जात आहे.सुपीक जमीनीचे भु संपादन करू नये असा कायदा असताना सगळे नियम धाब्यावर बसवून जमीन घेतली जात आहे.यापुढे शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनीचे संपादन करू नये अशी मागणी संघटनांनी केली आहे.
यावेळी बुडा ऑफिस समोर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली व जमीन संपादना विरोधात जोरदार निषेध नोंदवला.