Tuesday, May 14, 2024

/

बेळगाव ते वास्को-द-गामा पॅसेंजर रेल्वेसेवा पुनश्च प्रारंभ

 belgaum

नैऋत्य रेल्वेने रेल्वे क्र. 06921 /06922 ही बेळगाव- वास्को-द-गामा- बेळगाव व्दी साप्ताहिक पॅसेंजर स्पेशल रेल्वेसेवा शुक्रवार दि. 13 डिसेंबरपासून पुनश्च सुरू केली आहे. सदर रेल्वेसेवा येत्या 11 जानेवारी 2020 पर्यंत कार्यरत राहणार आहे.
रेल्वे क्र. 06921 /06922 ही बेळगाव- वास्को-द-गामा- बेळगाव व्दी साप्ताहिक पॅसेंजर स्पेशल रेल्वे दर शुक्रवार व शनिवारी बेळगावहून रात्री 12.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 6.20 ला वास्को-द-गामा (गोवा) येथे पोहोचेल. त्याचप्रमाणे ही रेल्वे दर शुक्रवार व शनिवारी सकाळी 6.05 मिनिटांनी वास्को-द-गामा येथून सुटेल आणि बेळगावला सकाळी 11.20 वाजता पोहोचेल. आपल्या प्रवासादरम्यान ही पॅसेंजर रेल्वे विविध रेल्वे स्थानकांवर थांबेल. या स्थानकांवरील रेल्वेच्या आगमन आणि प्रस्थानाची वेळ अनुक्रमे पुढील प्रमाणे आहे.

बेळगावहून देसुर रेल्वे स्थानक रात्री 12:40 आगमन आणि 12:41 प्रस्थान, खानापूर 12:54 /12:55, गुंजी 13:09/13:10, लोंढा 13:35/13:40, तीनईघाट 13:54/13:55, कॅसलरॉक 14:20/14:25 दूधसागर 15:15/15:20, कुलेम 16:00/16:05 सनव्हरदम 16:25/16:26, चंदर 16:34 /16:35, मडगाव 17:03/17:05, कान्सुलीम् 17:29/17:30 आणि दाबोलीम् 17:49 वा. आगमन/17:50 वा.वास्को-द-गामाकडे प्रस्थान.

वास्को-द-गामाहून दाबोलीम् 06:10/06:11, कान्सुलीम् 06:24/06:25, मडगाव 06:40/06:42, चंदर 06:55/06:56, सनव्हरदम 07:06/07:07, कुलेम 07:35/07:40, दूधसागर 08:15/ 08:20, कॅसलरॉक 09:05/09:10, तीनईघाट 09:29/ 09:30, लोंढा 09:55 10:00, गूंजी 10:16/10:17, खानापूर 10:34/10:35, देसुर 10:50 /10:51 वाजता बेळगावकडे. सदर बेळगाव ते वास्को-द-गामा स्पेशल पॅसेंजर रेल्वेला 8 जनरल सेकंड क्लास डबे आणि एक लगेच कम ब्रेक व्हॅन असेल.

 belgaum
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.