बेळगाव हुन शबरीमला आयप्पा स्वामी येथे चालत जाणाऱ्या बेळगावच्या भक्ताला वाहनाने ठोकरल्याने ठार झाल्याची घटना घडली आहे.बुधवारी रात्री अंकोला जवळील रामगोळी गावाजवळ घडली आहे.
संजय कल्लन्नावर वय 30 रा.तारिहाळ बेळगाव असे या अपघातात मयत झालेल्या युवकाचें नाव आहे.
बेळगावहून दर वर्षी शबरीमला दर्शनासाठी भाविक जात असतात यावेळी 20 जण पद यात्रेत सहभागी झाले होते.बुधवारी रात्री पद यात्रा सुरू असतेवेळी कारने त्याला धडक दिली त्यात त्याचा मृत्यू झाला आहे.अंकोला पोलिसांत या घटनेची नोंद झाली आहे.
बेळगाव आययपा सेवा समाजच्या मयत भक्ताला श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.