Saturday, April 20, 2024

/

हॉकी बेळगाव संघाने जिंकला कडोलकर चषक

 belgaum

बेळगाव जिल्हा हॉकी संघटना आयोजित निमंत्रियांच्या राज्य स्तरीय हॉकी स्पर्धेत बेळगावच्या हॉकी बेळगाव संघाने यंग स्टार हुबळी संघाचा 2-1अश्या गोल फरकांनी पराभव करून पहिला मोहन कडोलकर चषक पटकावला.

पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात हॉकी बेळगाव संघाने फिलोकोन संघाचा पेनल्टी स्ट्रोक 5-4 तर दुसऱ्या सामान्यात हुबळी संघाने गदग 2-1 असा पराभव करत अंतिम सामन्यात प्रवेश केला.अंतिम सामन्यात हॉकी बेळगावच्या संघाने हुबळी संघाचा 2-1 असा पराभव करून विजेतेपद पटकावले.

Hocky
Hocky

बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके धनंजय पटेल,नीता कडोलकर,रोहित कडोलकर, साजिद शेख आदी मान्यवरांच्या यांनी विजेत्या उपविजेत्या संघांना रोख रक्कम चषक देऊन गौरवण्यात आले.

उत्कृष्ट गोल किपर मनिकांत बी हुबळी संघ व उत्कृष्ट खेळाडू विजय पाटील बेळगाव संघ यांचा चषक देऊन गौरव करण्यात आला. कॅम्प येथील मेजर ए बी सायड हॉकी मैदानावर ही स्पर्धा भरवण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.