सुधारित नागरिकत्व कायदा दुरुस्ती करण्यात आल्यापासून देशभरात अनेक आंदोलने झाली. यामध्ये काही दुर्दैवी घटना घडल्या आहेत. कर्नाटकात मंगळूर येथे झालेल्या हिंसाचारात दोघा जणांचा बळी गेला आहे. या परिस्थितीत मात्र बेळगाव शांततेत आणि समाधानाने आहे. त्यामुळे शनिवारी मध्यरात्री लागू करण्यात आलेली जमावबंदी मागे घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
नागरिकत्व कायद्याविरोधात काही दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाची धग मागील काही दिवसांपासून दिसून येत आहे. राजधानी दिल्लीसह मुंबई बेंगलोर लखनऊ आधी शहरांबरोबर येथे झालेल्या हिंसाचाराच्या नंतर पोलिसांवर झालेल्या लाठीहल्ल्या नंतर या कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या अनेकांना अटक करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत बेळगाव येथेही अशी स्थिती निर्माण होऊ नये यासाठी बेळगाव येथील पोलिसांनी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळेच मागील काही दोन ते तीन दिवसांपासून जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला होता.
दिनांक 18 डिसेंबरच्या रात्रीपासून जमावबंदीचा आदेश बेळगांव शहर आणि परिसरात लागू करण्यात आला होता. मात्र बेळगाव शहरात कोणतेही अनुचित प्रकार घडले नसल्याने दिनांक 21 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून जमावबंदी कायदा मागे घेण्यात आला आहे. मात्र मोर्चा आंदोलने आणि इतर निवेदने परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे जमावबंदी हटविण्यात आली असली तरी मोर्चाला परवानगी देण्यास प्रशासनाने टाळले आहे. याची नोंद संबंधित संघटनांनी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे .
बेळगाव शहरातील संवेदनशील भागात तसेच तालुक्यातील विविध गावात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही आणि इतर माध्यमातून नजर ठेवली होती. त्यामुळेच बेळगाव शहरात कोणतेही अनुचित प्रकार घडले नसल्याने शनिवारी मध्यरात्रीपासून जमावबंदीचा आदेश मागे घेण्यात आला आहे. या निर्णयाचे स्वागत झाले असले तरी मोर्चाना मात्र परवानगी देण्यास प्रशासनाने टाळाटाळ केली आहे. 144 नुसार जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला होता. मात्र आता शनिवारी मध्यरात्रीपासून तो आदेश मागे घेण्यात आल्याने काही प्रमाणात नागरिकांत भीती कमी झाली आहे. नागरिकांनी पोलिसांना असे सहकार्य करावे असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.