Monday, May 6, 2024

/

वडापाव दुकानात सिलेंडर स्फोट-एक जखमी

 belgaum

शनी मंदिर कपिलेश्वर उड्डाण पुला जवळ वडा पाव दुकानात सिलेंडर स्फोट झाल्याने एक जण किरकोळ जखमी झाला आहे.रविवारी सायंकाळी पवणे पाच च्या दरम्यान ही घटना घडली आहे.

Silender blast
Silender

माधव उचगावकर वय 55 रा.कोरे गल्ली शहापुर असे या घटनेत जखमी इसमाचे नाव असून त्यांच्या पायाला इजा पोहोचली आहे उपचारासाठी त्यांना लागलीच खाजगी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.

माधव हे शनी मंदिर समोरे वडा पाव विकत असतात त्यावेळी अचानक सिलेंडर लिकेज होऊन स्फोट झाला दैव बलवत्तर म्हणून मोठी दुर्घटना टळली मात्र घटनास्थळी लोकांनी गर्दी केली होती. ब्रिजच्या खाली ही घटना घडली अग्निशामक दलाच्या गाडीला पाचारण करण्यात आले होते त्यांनी आग विझवली. या स्फोटा मुळे वडापाव दुकानाचे नुकसान झाले आहे.

 belgaum
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.