झेव्हीयर्सच्या अयान किल्ल्लेदार,रेहान किल्लेदार आणि स्पर्श देसाई यांनी प्रत्येकी एकेक केलेल्या गोलाच्या जोरावर बलाढ्य सेंट पॉल शाळेचा 3-1 अश्या गोल फरकाने पराभव करत प्रथमच सेंट झेव्हीयर्सने रॉयस्ट्स गोम्स फुटबॉल चषकावर आपले नाव कोरले.
गेल्या 35 वर्षात झेव्हीयर्सने पहिल्यांदाच रॉयस्टन गोम्स फुटबॉल स्पर्धा जिंकली आहे मागील वर्षी देखील अंतिम सामन्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता.आता पर्यंत दहा हुन अधिक वेळा अंतिम फेरीत हार पत्करली होती आज लेले मैदानावर त्यांनी सेंट पॉलचा पराभव करत चॉकर्स चा शिक्का देखील पुसुन टाकला.
रविवारी दुपारी टिळकवाडी येथे झालेल्या अंतिम सामन्यात पहिल्या हाफ मध्ये दोन्ही संघ गोल शून्य बरोबरीत होते दुसऱ्या हाफ मधील 31 व्या मिनिटाला सेंट पॉल च्या सुजल गंगेकर याने गोल जरत पॉल ला 1-0 आघाडी मिळवून दिली मात्र ही आघाडी केवळ दोनच मिनिटं टिकली सेंट झेव्हीयर्सच्या अयान किल्लेदार याने गोल करत बरोबरी साधली त्यानंतर 45 व्या आणि 51 व्या मिनिटाला रेहान किल्लेदार आणि स्पर्श देसाई यांनी एकेक गोल करीत झेव्हीयर्सला विजयी बनवले.
हेरवाडकर च्या कृष्णा मुचंडी आणि झेव्हीयर्स स्पर्श देसाई याला सर्वाधिक गोल तर हेरवाडवाडकर च्या श्रेयस बसुरतेकर याला उत्कृष्ट गोल किपर तर सेंट पॉलच्या सुजल गंगेकर याला स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू पुरस्कार देण्यात आला. साखळी सामन्यातील पुरस्कार लव्ह डेलच्या तेजस सोन्नद याला सर्वाधिक गोल, पोदार स्कुलच्या गजानन गौडा याला उत्कृष्ट गोल किपर, बेस्ट प्लेयर म्हणून कॅटोंमेंट बोर्डाचे सुफीयन चौधरी याला देण्यात आला.
अंतिम सामन्याला प्रमुख पाहुणे म्हणून मराठा सेन्टरचे डेप्युटी कमांडट कर्नल पी.एल.जयराम,कॅटोंमेंटचे साजिद शेख,रमेश रायजादे आदी उपस्थित होते.