लिफ्ट मागून एका मोटरसायकल तरुणाचा चाकूने गळा चिरून खून करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना नुकतीच सोनट्टी येथे घडली आहे. तरुण गंभीररित्या जखमी झाला असून पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली असून पूर्ववैमनस्यातून तिने हा प्रकार केल्याचे उघडकीस आले आहे.
शहानुर बसाप्पा राजकट्टी वय 25 राहणार सोनट्टी असे त्या जखमी तरुणाचे नाव आहे. इरवा सिद्धाप्पा मुचंडी वय 40 मुळची राहणार सोनट्टी सध्या काकती या महिलेने शहानुर त्याचा गळा चिरून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. लिफ्ट मागून ती त्याच्या मोटरसायकलीवर बसली होती. थोडा अंतर पुढे गेल्यानंतर तिने पुणे तिचा गळा चिरला आहे.
मोटरसायकलीवर पाठीमागे बसून इरव्वा मोटरसायकल चालविणाऱ्या शहानुरचा चाकूने गळा कापला. गावापासून थोड्या अंतरावर आल्यानंतर तिने हा डाव रचला आहे. अचानक झालेल्या हल्ल्यानंतर शानुर पुरता घाबरला त्याने आपली मोटर सायकल थांबवली. तरीही त्या महिलेने त्याच्यावर पुन्हा हल्ला करण्याचा प्रयत्न केला कसेबसे आपली सुटका घेऊन तिथून पोबारा केला.
लिफ्ट मागून जीवे मारण्याचा हा प्रयत्न पहिलाच असून तालुक्यात एकच खळबळ माजली आहे. या घटनेने वाहन चालक आत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून यापुढे कोणत्याही प्रवाशाला लिफ्ट देणे हे महागात पडणार काय? असाच प्रश्न सर्वसामान्य आतून होत आहे. त्यामुळे यापुढे सावधानता बाळगूनच अनेक जण लिफ्ट देणाऱ्याची ची शक्यता नाकारता येत नाही. काकती पोलीस संबंधित महिलेला अटक करून तिला न्यायालयासमोर हजर केले आहे.