पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यास येणाऱ्या व्यक्तीची तक्रार त्वरित नोंदवून घेतली पाहिजे.नोंद झालेल्या तक्रारीची ठराविक कालावधीत चौकशी पूर्ण केली पाहिजे.जनतेची तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असे उदगार राज्याचे गृहमंत्री बसवराज बोम्माई यांनी काढले.निपाणी येथे अग्निशामक ठाण्याचे आणि वसतिगृहाचे उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.
राज्यातील एस डी आर एफ अधिक सक्षम करण्यासाठी वीस कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.चिकोडीसाठी अतिरिक्त जिल्हा पोलिस प्रमुख पद लवकरच मंजूर करण्यात येईल. निपाणी येथे तीन पोलीस स्थानकाना नवीन इमारती साठी पुढील बजेट मध्ये निधी मंजूर करू असे आश्वासन देत सीमा वर्ती जिल्ह्यातील मादक वस्तु तस्करी नियंत्रण आणा अश्या सूचना अधिकारी यांना दिल्या आहेत असेही ते म्हणाले
सध्या साठ टक्के पोलीस कर्मचाऱ्यांना वसतिगृहे उपलब्ध करून देण्यात आली असून पुढील वर्षापर्यंत ऐशी टक्के कर्मचाऱ्यांना वसतिगृहे उपलब्ध करून देण्याचे सरकारचे ध्येय आहे असेही बोम्माई यांनी सांगितले.यावेळी महिला बाल कल्याण मंत्री शशिकला जोलले, खासदार अण्णासाहेब जोलले महंतेश कवटगीमठ आदी उपस्थित होते.