गोवा वेस जवळील हेस्कॉम कार्यालयात अखेर सामान्य माणसांना चप्पल घालून जाण्यास प्रवेश मिळाला आहे.बेळगाव Live ने घातलेल्या बातमी नंतर हेस्कॉम विभाग खडबडून जागे झाले आहे.
या ऑफिसमध्ये येणाऱ्या नागरिकांना बाहेर चप्पल काढून या असा दंडक लावणाऱ्या अधिकाऱ्यांला वरिष्ठ अधिकाऱ्यानी झडती घेतली आहे.
केवळ हेस्कॉम नव्हे तर कोणत्याच शासकीय कार्यालयात चप्पल बाहेर काढून आत प्रवेश असा कायदा नाही.पोलीस स्थानक किंवा न्यायालयात देखील चप्पल काढून प्रवेश करणे असे कायद्यात नाही त्यामुळे असे दंडक लावणाऱ्या गोवा वेसच्या हेस्कॉम अधिकाऱ्यांवर चौफेर टीका झाल्याने त्या अधिकाऱ्यांला नमते घेत सर्वाना चप्पल घालून प्रवेश दिला आहे.
या बाबाबचे सविस्तर वृत्त बेळगाव Live ने काल प्रसारित केले होते त्या नंतर अधिकारी जागे झाले होते. सामाजिक कार्यकर्ते वकील हर्षवर्धन पाटील यांनी या विरोधात आवाज उठवला होता.