इद–ए–मिलाद मिरवणुकी दरम्यान आझादनगर येथे रविवारी दुपारी हाणामारीची घटना घडली. हाणामारीत दोघे जण जखमी झाले असून यासंबंधी माळमारुती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आली आहे.
समीर अब्दुलरझाकसाब खतीब (वय 45), असिफ खाजापीर हुदली (वय 25 रा. अमननगर) अशीजखमींची नावे असून त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले आहेत. यासंबंधी माजी नगरसेवक अक्रम बाळेकुंद्री व ताहिर अन्य जणा यांच्याविरुद्ध माळमारुती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
रविवारी दुपारी साडेबाारा वाजण्याच्या सुमारास इद–ए–मिलादची मिरवणूक सुरू असताना सत्कारावरून वादावादी झाली. वादावादीनंतर हाणामारीची घटना घडली. पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर यांनी वेळीच हस्तक्षेप करीत जमावाला आटोक्यात आणले. त्यानंतर मिरवणुकीला पुन्हा सुरुवात झाली.मारामारीनंतर परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.
आझाद नगर भागात एका महिला समाज सेविकेचा सत्कार झाला होता या सत्कारामुळे नाराज माजी नगरसेवकाने त्या समाज सेविकेच्या समर्थकांना मारहाण केली अशी तक्रार माळ मारुती पोलिसांत नोंद झाली आहे.आझाद नगर भागात पुढील महा पालिका निवडणूक डोळ्या समोर ठेऊन ही मारहाण झाल्याचे बोलण्यात येत आहे.