बदली झालेल्या ऑपरेटर्स ना राजकीय वजन वापरून पुन्हा आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.जुने ऑपरेटर्स शिवाय कामकाज चालूच शकत नाही हे भासविण्याचा प्रयत्न काही एजंटां कडुन केला जात आहे.जर का जुन्या भ्रष्ट ऑपरेटर्स पुन्हा आणले गेले तर भ्रष्टाचार निर्मुलन परिवार सह अनेक सामाजिक संघटना कडून आंदोलन हाती घेण्याचा इशारा वकील नामदेव मोरे यांनी दिला आहे.
कर्नाटक राज्यात सर्वाधिक महसूल देणारं नोंदणी कार्यालय म्हणून बेळगावचे सब रजिस्ट्रार परिचीत आहे अश्या स्थितीत या कार्यालयात चाललेला गोंधळ थांबवण्याची गरज व्यक्त केली जात आहे.या विरोधात भ्रष्टाचार निर्मुलन संघटना कार्यरत झाली आहे.
बक्कळ माया कमावलेले कॉम्प्युटर ऑपरेटर् झालेली बदली पाहून घाबरले आहेत दररोज मिळणारे पैशाचे कुरण सोडून जावे लागणार असल्याने ते बेचैन झाले आहेत परत त्याच ठिकाणी राहून बदली रद्द करण्याचा खटाटोप त्यांनी चालवला आहे असा आरोप भ्रष्टाचार निर्मुलन संघटनेचे वकील नामदेव मोरे यांनी केला आहे.
आमच्या शिवाय नवीन ऑपरेटर्सना हे काम जमणार नाही असे एजंट करवी भासविण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे.दररोज हजारो रुपये वर कमाई करणाऱ्या व भ्रष्टाचार मूळ कारणीभूत असणाऱ्या ऑपरेटर्स बेळगाव सब रजिस्ट्रार मधून गेल्याशिवाय हा कारभार सुधारणार नाही अशीही भूमिका त्यांनी मांडली आहे.
राजकीय वजन वापरून जुन्या ऑपरेटर्स आणल्यास आंदोलन करू असा इशारा फिर्यादी वकील मोहनराव मोहिते व नामदेव मोरे यांनी दिला आहे