मच्छे गावातील वाचकांना आनंदाची बातमी दसऱ्याच्या निमित्ताने आली आहे या गावातील वाचनालय नियमितपणे सुरू राहणार आहे.
1973 साली सुरू करण्यात आलेले मच्छे येथील श्री बाल शिवाजी वाचनालय मध्यंतरीची काही वर्षे आठवड्यातून एकदाच चालू ठेवले जायचे पण गेल्या काही दिवसात या वाचनालयाच्या तरुण संचालकांनी हे वाचनालय रोज नियमीत चालू ठेवण्याचा निर्णय घेतला .त्याला अनुसरून दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर श्री कलमेश्वर मंदिर येथे श्री बाल शिवाजी वाचनालय पुनः सुरुवात करण्यात आले.
वाचनालय आता नियमित दररोज सायं. 7:30 ते 8:30 या वेळेत चालू राहणार आहे.यावेळी वाचनालयाचा जीर्ण झालेला जुना फलक काढुन नवीन बसविण्यात आला. त्याचे अनावरण वाचनालयाचे संस्थापक सदस्य व सार्वजनिक वाचनालय बेळगाव चे संचालक अनंत लाड यांच्या हस्ते करण्यात आले.वाचनालयाच्या सदस्यांच्या वतीने पुस्तक प्रदर्शन भरविण्यात आले होते. यावेळी श् अनंत लाड व कृष्णा अनगोळकर यांनी आपल्या भाषणात वाचन संस्कृतीचे महत्व सांगितले.
वाचनालयाचे अध्यक्ष नारायण अनगोळकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. वाचनालयाचे पुर्वीचे संस्थापक सदस्य भोमाणी बीर्जे, जयपाल चौगुले यांच्यासह संतोष जैनोजी, बजरंग धामणेकर, श्रीकांत जाधव, परशराम चौगुले ,अरुण कुंडेकर, संतोष अनगोळकर, पंकज चौगुले, गजानन जैनोजी , शंकर नावगेकर आणि इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
कुमारी अनघा चौगुले ,अपूर्वा चौगुले ,मेघा धामणेकर, समीक्षा नावगेकर व तनिष्का नावगेकर या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले. या कार्यक्रमात दुर्गा दौडच्या शिवभक्त युवकांनी सहभागी होऊन पुस्तक प्रदर्शनाचा लाभ घेतला.