बेळगावातील विविध दूध उत्पादक संघ आणि दूध विक्रेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत विदेशी दूध आयाती वर बंदी घालण्याची मागणी केली आहे ,त्या निमित्ताने पुन्हा एकदा दुधाचा प्रश्न बेळगावात ऐरणीवर आला आहे.
अगदी प्राथमिक अन्नाची ची गरज म्हणून दुधाकडे पाहिले जाते.
दुधाला अमृत मानले जाते.लहाना पासून थोरांपर्यंत सर्वांनाच दुधाची निकड असते. कोजागिरी पौर्णिमेला तर मसाला दुधात चंद्र पाहून दूध पिले जाते दुधापासून बनणारे उपपदार्थ ताक, दही, तूप यांचा उपयोग करून जेवण रुचकर बनवले जाते. माणसाच्या आयुष्यात दुधाचे महत्व अनन्यसाधारण आहे
बेळगाव शहरात साधारणपणे दीड लाख लिटर दुधाचा खप दररोज आहे. हे बेळगावात येणारे दूध बेळगावातील नंदिनी दूधडेअरी,आदित्य डेअरी बरोबरच, महाराष्ट्रातून गोकुळ, वारणा,भारत डेअरी, हुतात्मा डेअरी व इतर छोट्या मोठ्या डेअर्या कडून येते. गाय दूध ,म्हैस दूध ,टोन दूध, स्टॅंडर्ड दूध अशा रुपात प्लास्टिक पिशव्या मधून बेळगाव शहरात दूध उपलब्ध होत असते. परंतु असे येणारे दूध, पिशवी वर लिहिलेल्या प्रमाणातच प्रामाणित आहे का? त्यातील शुद्धता निश्चित आहे का ?याची पडताळणी अन्न सुरक्षा वजनमाप खात्याकडून करण्याचे गरजेचे असते. पण ते त्याप्रमाणे पडताळणी केली जात असल्याचे दिसत नाही.
थोड्या दिवसापूर्वी बेळगावात येणारा एक दुधाचा ब्रांड बंद करण्यात आला ,कारण त्यातील दूध हे रासायन मिश्रित असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. बेळगाव करांच्या आरोग्याबाबत अन्न नागरी पुरवठा खाते जागरूक आहे का? हा.देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे.
लहान मुलापासून थोरापर्यंतच्या आरोग्याशी निगडित असणाऱ्या दुधासाठी प्रशासन अधिक सजग असण्याची गरज आहे दुधाच्या प्रमाणिकतेची तपासणी करण्याची गरज आहे ,नाहीतर नागरिकांच्या खिशाबरोबर त्यांच्या आरोग्याशी खेळला जाणार हा खेळ एक दिवस उग्ररुप घेऊ शकतो .ग्राहकांच्या हक्काच्या रुपयाचा त्याला योग्य मोबदला मिळण्यासाठी ग्राहक जागृती मंचने कार्य करणे गरजेचे आहे. दुधाचे फॅट, शुद्धता माप त्याच्या पदरात योग्यप्रकारे पडत आहे का?की मापात ‘पाप’ चालले आहे हे पाहिले पाहिजे.
बेळगाव शहरात ज्यावेळी नगरपालिका अस्तित्वात होती त्यावेळी शहरात विकल्या जाणाऱ्या दुधाचे, हॉटेलमधील पदार्थांची दररोज तपासणी होत होती, दूध विक्री करण्याची तपासणी केली जात होती. मात्र अलीकडे दुधाची तपासणी होताना दिसत नाही