बेळगाव शहर आणि परिसरात सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे पुन्हा सारेजण हतबल झाले आहेत. या पावसामुळे शेती आणि व्यवसायावर मोठा परिणाम होत आहे. पाऊस नको रे बाबा म्हणण्याची वेळ साऱ्यावर आली आहे. जर पाऊस गेला नाही तर आता तोंडाला आलेल्या पिकांना याचा मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे सध्यातरी पावसाने विश्रांती घ्यावी अशीच मागणी साऱ्यातून होत आहे.
मागील काही दिवसांपासून परतीच्या पावसाने दररोज सलामी देण्यास सुरुवात केली आहे. बटाटा भुईमूग व सोयाबीन पिकावर याचा मोठा परिणाम झाला आहे. सुगीच्या काळात पावसाने झोडपल्याने अनेकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागला आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे बटाटा यासह इतर पिकेही खराब झाली आहेत. त्यामुळे शेतकरी हतबल बनला आहे.
बेळगाव शहर आणि परिसरात परतीच्या पावसाने चांगलेच झोडपले आहे. सध्या भात पीक कापणीला सुरुवात होणार आहे. मात्र सुरू असलेल्या पावसामुळे काही भात पिकावर याचा परिणाम जाणवला आहे. कापणीच्या कामात पावसाने व्यत्यय आणल्याने काही भात पिके शेतातच पडून आहेत. त्यामुळे पाऊस नको रे बाबा असे म्हणण्याची वेळ आली आहे.
पावसामुळे काही बटाटा पीक शेतातच कुजून गेले आहेत. तर काही भागात अजूनही काढणी न झाल्याने शेतकऱ्यांतून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. परतीच्या पावसाने बेळगावच्या बाजारपेठेवरही परिणाम केला आहे. संध्याकाळच्या काळी सुरू होणाऱ्या परतीच्या पावसामुळे अनेक व्यवसाय थंडावले आहेत. दिवाळीच्या तोंडावर पावसाने झोपून काढल्याने व्यवसायिक आतून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.