बेळगाव रेल्वेस्थानकाचा चेहरामोहरा बदलणार असून येथे विमानतळा प्रमाणे सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील अशी माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी बेळगाव रेल्वे स्थानकावर माध्यमांशी बोलताना दिली.
अंगडी यांनी रेल्वे स्थानकाची पाहणी करून रेल्वे अधिकाऱ्यांना सूचना केल्या.रेल्वे स्थानकाची नवी इमारत बांधण्यात येणार असून त्याला चौदा कोटी रुपये खर्च येणार आहे.एकूण तीन मजली इमारत रेल्वे स्थानकाची उभारण्यात येणार आहे.
अद्ययावत रिझर्वेशन काऊंटर, वेटिंग रूम, राहण्याची व्यवस्था,चेंजिंग रूम, दुचाकी,चारचाकी पार्किंग,फूड कोर्ट आदी सुविधा रेल्वे स्थानकावर उपलब्ध करण्यात येणार असल्याचे मंत्री सुरेश अंगडी यांनी सांगितले.
रेल्वे स्थानकाच्या एंट्री मध्ये मेटल डिटेक्टर नसल्याने स्टेशनची सुरक्षा राम भरोसे अशी टीका करण्यात येत असताना रेल्वे राज्य मंत्र्यांनी पहाणी केली. रेल्वे स्थानकाचा कायापालट विमान तळा प्रमाणे करू असेही अंगडी यांनी म्हटले आहे.