belgaum

हुबळी -जोधपूर विशेष रेल्वे सेवा सुरू करण्याची ‘यांची’ मागणी

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह :हुबळी ते जोधपूर नवीन नियमित रेल्वे सेवा किंवा सुट्टीतील विशेष रेल्वे सेवा 3 महिन्यांसाठी सुरू करावी, अशी मागणी राजस्थान समाज बेळगावने एका निवेदनाद्वारे खासदार जगदीश शेट्टर यांच्याकडे केली आहे.

राजस्थान समाज बेळगावच्या शिष्टमंडळाने विक्रमसिंह राजपुरोहित यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच बेळगावचे खासदार शेट्टर यांची भेट घेऊन उपरोक्त मागणीचे निवेदन त्यांना सादर केले. खासदारांनी निवेदनाचा स्वीकार करून मागणीची पूर्तता करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.

आम्हाला उत्तर कर्नाटकातील लोकांना बेळगाव ते गुजरात आणि राजस्थान प्रवास करण्यासाठी अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. आता सध्याची रेल्वे ही बेंगलोरहून सुरू होते. या रेल्वेच्या तिकिटांचे आरक्षण दोन महिने आधीच अवघ्या कांही मिनिटात होत असते.

 belgaum

आता सणासुदीचा हंगाम येत असून शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी सुरू होत असल्याने 30 जूनपर्यंत या मार्गावर प्रचंड गर्दी असते. यासाठी आमची तुम्हाला विनंती आहे की, या मार्गावर किमान 3 महिन्यांसाठी एक नवीन नियमित रेल्वे सेवा किंवा सुट्टीतील विशेष रेल्वे सेवा (हॉलिडे स्पेशल ट्रेन) सुरू करावी.

या खेरीज हुबळी ते जोधपूर अशा अतिरिक्त रेल्वे सेवेची सोय देखील करावी ही विनंती, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.

निवेदन सादर करतेवेळी विक्रमसिंह राजपुरोहित यांच्या समवेत नरपतसिंह राजपुरोहित, महेन्दसिंह राजपुरोहित, जोरसिंह राजपुरोहित, अमृतलाल शर्मा, हूजाराम चौधरी, केसाराम पटेल, संतोष शर्मा, राव जी, चन्दनसिंह आदी उपस्थित होते. उपरोक्त निवेदनाची प्रत नैऋत्य रेल्वे हुबळीचे व्यवस्थापक, जलोरी -सिरोहीचे खासदार लुब्राम चौधरी आणि पालीचे खासदार पी. पी. चौधरी यांनाही धाडण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.