अटल बिहारी मार्गावरील फलक पडला
स्मार्ट सिटीच्या निकृष्ट दर्जाचा प्रकार पुन्हा एकदा पाहायला मिळाला आहे. निकृष्ट दर्जामुळे उद्भवलेल्या कामाचा फटका अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावालाही बसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे स्मार्ट सुट्टीत खरेच दर्जेदार काम होत आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सध्या शहराच्या विविध चौकात नामफलकाचे अनावरण करण्यात येत आहे. मात्र मागील दोन दिवसापुर्वी अटल बिहारी वाजपेयी फलक कोसळला आहे. त्याचे योग्य नियोजन नसल्यामुळे हा प्रकार निदर्शनास आला आहे. निकृष्ट दर्जाचे काम केल्यामुळे अटल बिहारी वाजपेयी यांचा फलक कोसळ आहे. मात्र याकडे महानगरपालिकेचे साफ दुर्लक्ष झाले असून एका पंतप्रधाना त्या फलकाची अवस्था पाहून अनेक आतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी केलेले कार्य पाहिल्यास देशासाठी ते भव्य आणि दिव्य असेच आहे. मात्र बेळगावात त्यांच्या कार्याची पोचपावती मिळाली असे दिसत नाही . महानगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे त्यांच्या नावाचे वाटोळे झाल्याचे दिसून येत आहे. याठिकाणी अटल बिहारी वाजपेयी यांचा फलक लावण्यात आला होता. त्या ठिकाणी त्याचे योग्य नियोजन नसल्यामुळे तो फलक केवळ पाच ते सहा महिन्यात आहे. त्यामुळे त्यांचा संताप व्यक्त होत आहे.
मागील वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी बेळगावला आले होते. त्यावेळी शहरात एक अटल बिहारी वाजपेयी असा रस्ता व्हावा अशी त्यांची अपेक्षा होती. त्यानुसार ती झाली मात्र ज्या फलकाचे अनावरण ज्या रस्त्यासाठी करण्यात आले होते. त्या ठिकाणी फलक लावण्यात आला होता. तो फलक निकृष्ट दर्जाच्या बसवल्यामुळे काही महिन्यातच कोसळला आहे. जर स्मार्ट सिटी अंतर्गत असेच प्रकार सुरू असतील तर यापुढे कोणत्या कामांना योग्य प्रकारे चालना देण्यात येईल याचेही लक्षता महानगरपालिकेने ठेवायला हवे या महानगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे एका प्रधानमंत्री अवमान झाला आहे. का असा प्रश्न निर्माण होत आहे.