Monday, April 29, 2024

/

पूर ओसरला पण मनातील आठवणी कायम

 belgaum

बेळगाव जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले तर काहींना घर सोडून निवारा शोधावा लागला. नदी नाले तुडुंब भरून वाहत होते आणि अनेकांचे संसार त्याच प्रवाहात घेऊन जात होत्या. सध्या नदी नाल्यांचे पाणी स्थिरावते आहे, जनजीवन पूर्वपदावर येत आहे. मात्र मनातील आठवणींचा पूर अजूनही कायम आहे.

माणुसकिला गालबोट लावणाऱ्या चोरट्यांच्या आठवणी जसा काहीसा थरकाप उडवतात तसे पुराच्या पाण्याबरोबर वाहून गेलेले साहित्य आणि संसार तशाच आठवण ठेवतात. काहीजणांनी तर या पुरात तीन ते चार दिवस एकाच झाडावर, छतावर किंवा फडक्यात काढले आहेत. 2005 सली झालेल्या पुरा पेक्षाही या पुरात मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. बेळगाव शहराची वाताहत करण्याबरोबरच जिल्ह्याचा नकाशा बदलून सोडणारा हा महापूर होता.

4 ऑगस्ट पासून पुराच्या पाण्याने आपले महाकाय रूपाचे दर्शन घडवण्यात सुरुवात केली होती. बेळगाव अथणी येथील तसेच इतर तालुक्यांना सावकाश सावकाश याचा फटका बसत होता. मदतकार्य सुरू होते. पाणी वाढू लागल्यानंतर अनेकांनी स्वतःहून स्थलांतर केले तर काहींना शासनाच्या मदतीने स्थलांतरित करण्यात येत होते. यामध्ये शेकडो कुटुंबे स्वतःचे संसार सोडून घराबाहेर पडली. या महापुरात घराबाहेर पडताना त्यांच्या घरातील आठवणी त्या मनातच राहिले आहेत. त्यांनी मांडलेले संसार आणि एका महापुरामुळे त्यांच्या पुसलेल्या आठवणी आजही मनात तशाच रुतून बसले आहेत.

 belgaum

महापुरात काहींना शारीरिक व्याधीमुळे बाहेर पडता आले. नाही अशांचे अनुभव मात्र जितके विदारक तितकेच अंगावर काटा उभा करणारे होते. काहींना तब्बल सहा ते सात दिवसानंतर या पुराच्या वेढ्यातून बाहेर काढण्यात आले. पुराचे पाणी जरी आता पूर्णपणे उतरले तरी त्यांच्या आठवणींचा महापूर मात्र अजून उतरता उतरत नाही. यामध्ये काहींना आपला जीवही गमवावा लागला आहे. तर नव्याने मांडले संसार एका पुरात नाहीसे झाले आहेत. या साऱ्या आठवणी बाजूला सारून नव्याने संसार उभे करण्यासाठी धडपड करणाऱ्या आणि पुन्हा त्याच घराच्या आठवणी मनात ठेवून कामाला लागणाऱ्या साऱ्यांनाच हा महापौर अजूनही मनात घर करून राहिला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.