बेळगाव शहरात आलेल्या जलप्रयात केवळ माणसंच नव्हे तर जनावरांना देखील त्रास सहन करावा लागत आहे.कोनवाळ गल्ली शेजारील नाल्यात पूर आल्या नंतर शहरातील मध्यवर्ती भागात पाणी साचले.त्यातल्या त्यात कोनवाळ गल्लीत नाल्या शेजारी याचा प्रभाव अधिक होता.
कोनवाळ नाल्या शेजारील म्हशींना देखील शासकीय आसरा मिळाला आहे नाल्यात पाणी येताच कोनवाळ गल्ली पालिका कार्यालयाच्या समोर म्हशी बांधण्यात आल्या आहेत त्यांना तिथेच चारा पाणी दिले जात आहे.
या गल्लीतील नाल्याच्या शेजारील चाळीस पीडितांना समुदाय भवनात,28 नंबर शाळा व अंगणवाडी केंद्रात आश्रय देण्यात आला आहे तर इथेच पूरग्रस्त आश्रय मदत केंद्र बनवलं आहेत.
माजी नगरसेविका सरिता पाटील यांच्या माध्यमातून या सर्वांना मदत गंजी दिली जात आहे.अन्न नागरी खात्याच्या मंजुश्री बडीगेर यांच्या देखरेखीखाली गंजी केंद्रात चाळीस पीडित आणि जनावरांची सोय केली जात आहे