Sunday, April 28, 2024

/

उत्सव काळात समाज कंटकावर करडी नजर –

 belgaum

पोलीस कमिशनर व्याप्तीत 1072 गणेश मंडळ तर 103 पंजे 13 ताबूत प्रतिष्ठापणा होत असून गणेश उत्सव आणि मोहरम काळात शहर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येईल अशी माहिती पोलीस आयुक्त बी एस लोकेशकुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शनिवारी सायंकाळी पोलीस आयुक्तांलयात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.यावेळी डी सी पी सीमा लाटकर, डी सी पी यशोदा वंटगुडी सह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

असा असेल पोलीस बंदोबस्त

 belgaum

2 ते 12 सप्टेंबर पर्यंत एकूण दोन टप्प्यात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.पहिल्या टप्प्यात एक पोलीस आयुक्त 2 डी सी पी पाच ए सी पी 20 सी पी आय,12 पी एस आय,60 ए एसआय,980 पोलीस तर 450 होमगार्ड तैनात केले जाणार आहेत.

दुसऱ्या टप्प्यात गणेश विसर्जन काळात एक पोलीस आयुक्त,4 डी सी पी,20 ए सी पी,67 पोलीस निरीक्षक,339 पोलीस उपनिरीक्षक,60 ए एस आय आणि 2798 पोलीस कॉन्स्टेबल ,450 होम गार्ड तैनात केले जाणार आहेत या शिवाय 5 सिटी रिजर्व पोलीस,9 के एस आर पी तुकड्या एक केंद्रीय पोलीस पथकाची तुकडी तैनात असणार आहे.

उत्सव काळात समाज कंटकावर पोलिसांची करडी नजर असणार असून मिरवणूक मार्ग आणि विविध प्रार्थना स्थळे इतर संवेदनशील ठिकाणी 152 सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.मिरवणुकी वेळी 258 सी सी टी व्ही कॅमेरे त्यावर नजर ठेवन्यासाठी कार्यरत विशेष टीम असणार आहे.पोलिसांच्या 20 शक्ती गाड्या 24 तास पेट्रोलिंग करणार आहेत यासह 18 रक्षक 2 हायवे पेट्रोलिंग तैनात करण्यात आले आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.