सामान्य नागरिक बिले भरत नाहीत. तेंव्हा हेस्कोम लगेचच वीज कापते पण एक सरकारी खाते जेंव्हा विजेचे बिल भरत नाही तेंव्हा काय? बेळगावच्या कॅन्टोन्मेंट बोर्डाने हेस्कोम चे 1.4 कोटी रुपये थकबाकी ठेवली आहे. जुलै 2016 पासूनचे हे बिल थकीत आहे.
येत्या शनिवारी 31 तारखेला सकाळी 11 वाजता कॅन्टोन्मेंट बोर्डाची बैठक आहे. या बैठकीची माहिती देताच अरविंद गदगकर या हेस्कोम अधिकाऱ्यांनी कॅन्टोन्मेंट बोर्ड च्या या थकबाकीची माहिती त्याच व्हाट्स एप ग्रुपवर दिली. यामुळे दोन खात्यात आर्थिक थकबाकीची ही माहिती उघडकीला आली आहे.
पण यामुळे हेस्कोमनेही कॅन्टोन्मेंट बोर्ड ला अजून इतकी थकबाकी ठेवूनही कोणती कारवाई का केली नाही याचीही चर्चा सुरू आहे.
हेस्कोम ने हे बिल वसूल करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केले पण यश आले नाही यामुळे गणेश चतुर्थी नंतर कनेक्शन तोडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. येत्या बैठकीत या मुद्द्यावर चर्चा होईल या अपेक्षेतून माध्यम ग्रुपवर ही चर्चा झाली तरी त्याची चर्चा जोरदार सुरू आहे.