Monday, May 6, 2024

/

बेळगाव विभागात बारा हजार पोलीस तैनात:आय जी पी

 belgaum

गणेशोत्सवासाठी पोलीस खात्याने गणेशोत्सव कालावधीत बारा हजार पोलीस तैनात केले असून उत्तर विभाग परिक्षेत्रातील पाच जिल्ह्यात एकूण १०९८० गणेशोत्सव मंडळे आहेत.यंदा पुराने बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून गणेशोत्सव,मोहरम साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन उत्तर विभागाचे आय जी पी राघवेंद्र सुहास यांनी पत्रकार परिषदेत केले.

जिल्हा पोलीस सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत राघवेंद्र सुहास यांनी गणेशोत्सव कालावधीत ठेवण्यात येणाऱ्या पोलीस बंदोबस्ताची माहिती दिली.एकूण पाच जिल्ह्यात बारा हजार पोलीस बंदोबस्त ठेवणार आहेत.जलद कृती दल,राज्य राखीव पोलीस दल,जिल्हा सशस्त्र पोलीस दल आणि गृहरक्षक दल बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहेत. आजपर्यंत १०९८० मंडळांना परवानगी देण्यात आली आहे.

Raghvendra suhas igp

 belgaum

मंडप उभारणीच्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थानी स्वच्छता केली आहे.हेस्कॉ मला गणेशोत्सव काळात वीजपुरवठा खंडित करू नये अशी सूचना करण्यात आली आहे.

गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून त्यांच्या समस्या निराकरण करण्यात येतील.पुरबाधित प्रदेशातील जनतेला गणेशोत्सवासाठी आवश्यक ती साधन सामुग्री पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.कोणालाही त्रास होणार नाही अशा पद्धतीने गणेशोत्सव,मोहरम साजरा करा.

बेळगाव जिल्ह्यात३८९६,विजापूर २०७५,धारवाड १२४५,गदग १३५५ असे एकूण १०९८० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत अशी माहिती आय जी पी राघवेंद्र सुहास यांनी दिली .पत्रकार परिषदेेेला जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण निंबरगी ,अतिरिक्त जिल्हा पोलिस प्रमुख राम लक्ष्मण अरसिद्धी आदी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.