बेळगाव मनपा निवडणुकीवर घालण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणी पुन्हा पुढे ढकलली आहे. माजी नगरसेवक व उप महापौरांनी दाखल करण्यात आलेली याचिका पुन्हा आठवड्याभराच्या कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आली आहे.
आज या संदर्भात कर्नाटक उच्च न्यायालयाचे धारवाड येथील खंडपीठात सुनावणी होणार होती. बेळगावातील माजी नगरसेवक आणि उपमहापौर यांच्या समूहाने घातलेल्या याचिकेवर सुनावणी 40 वा क्रमांक होता . मात्र सुनावणी होऊ शकलेली नसून पुढील दोन आठवड्या नंतर होईल असे न्यायालयाने सांगितले आहे.
त्या सुनावणी व त्यानंतर न्यायालयाने दिलेल्या निकालावर बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीचे भवितव्य अवलंबून आहे .महानगरपालिका वॉर्ड रचना आणि आरक्षण यासंदर्भात माजी नगरसेवकांनी व उपमहापौरांनी आक्षेप घेतल्यामुळेच याचिका दाखल करण्यात आली आहे .
इकडे निवडणुकीची तयारी सुरू असताना अद्याप निवडणुकीच्या प्रक्रियेवर निर्णय नाही. न्यायालयीन कार्यवाही सुरू आहे.दाखल करण्यात आलेली याचिका सुनावणी होत नाही तोपर्यंत मनपा निवडणुकीचे भवितव्य अधांतरीच राहणार आहे.प्रलंबित सुनावणी गुरुवारी होऊ न शकल्याने पुढच्या दोन आठवड्यात नंतर 12 सप्टेंबर रोजी ही सुनावणी होणार आहे. म्हणजेच गणेश विसर्जन रोजी मनपा निवडणुकीचे भवितव्य ठरण्याची शक्यता वकील धनराज गवळी यांनी व्यक्त केली आहे.