Saturday, January 25, 2025

/

आत्म्याला परमात्म्याशी जोडणे म्हणजे योग: रमेश गंगूर गुरुजी

 belgaum

शरीराला बुद्धिशी जोडणे, बुद्धीला मनाशी जोडणे, मनाला आत्म्याशी जोडणे व आत्म्याला परमात्म्याशी जोडणे हेच योग साधनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.योग म्हणजे जोडणे.आत्म्याचे परमात्म्याशी मिलन हीच योगाची प्रमुख व्याख्या आहे.
1995 पासून साधारणपणे 10 हजार जणांना योग शिकवलेले रमेश गंगूर गुरुजी यांनी जागतिक योग दिनी ही माहिती बेळगाव live च्या वाचकांना दिली आहे.
गंगूर गुरुजी हे बालपणापासूनच योगी आहेत. वयाच्या पाचव्या वर्षांपासून त्यांना त्यांच्या वडिलांनी योगा शिकवले. त्यांनी आपल्या वडिलांच्याच नावे एम वाय गंगूर फौंडेशन 1995 साली साली सुरू केले. तेंव्हापासून विविध कार्यक्रम घेऊन योग जागृतीचे काम सुरू आहे. योग तसेच रेकी, प्राणिक हिलींग, अशी सर्व भारतीय शास्त्रे ते शिकवतात.

Gangoor guruji yoga
गेल्या पाच वर्षांपासून हरिमंदिर जवळील इंजिनिअर्स कॉम्प्युटर अकादमी मध्ये माय योगा अकादमी सुरू केली आहे रोज सकाळी योगाचे मोफत क्लास ते घेतात.
भारत सरकारच्या आयुष खात्यासाठी वेगवेगळी शिबिरे त्यांनी घेतली आहेत. शाळा व महाविद्यालयात जाऊन ते जागृती करतात.
व्यास विद्यापीठ बेंगळुरू चे स्टॉप डायबेटिक अभियान त्यांनी बेळगावमध्ये घेतले आहे. 10 दिवसाचा कार्यक्रम असतो. ,याने मधुमेह नियंत्रणात ठेवणे शक्य होते असेही त्यांनी सांगितले.
योग आसन म्हणजे शारीरिक आसने आणि अष्टांग योग म्हणजे
आठ प्रकारचे योग असतात.
यमन ,यम ,आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा ,ध्यान, समाधी असे अष्टांग योग आहेत.परिपूर्ण योग म्हणजे अष्टांग योग, ध्यान हे सुद्धा योग आहे. यामुळे फक्त शारीरिक व्यायाम नव्हे तर मनाला आणि बुद्धीला व्यायाम दिल्यास परिपूर्ण योगाभ्यास होऊ शकतो असे रमेश गंगूर यांनी सांगितले.
त्यांच्या या सामाजिक कार्याबद्दल त्यांना विविध पुरस्कार देऊन सन्मान झाले आहेत. बहुमुख प्रतिभा संपन्न गुरू ही त्यांना मिळालेली उपाधी आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.