Friday, May 3, 2024

/

बुधवारी बेळगावात साजरी होणार रमजान ईद

 belgaum

अंजुमन सभागृहात झालेल्या चंद्र दर्शन कमिटीच्या बैठकीत उद्या बुधवारी बेळगावात रमजान ईद साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.मुस्लिम समाजातील मौलवी नेते आणि अंजुमन पदाधिकाऱ्यांनी संयुक्त बैठकीत बेळगावात बुधवारी ईद साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई दिल्ली आणि बंगळुरू येथील चांद समिती नेत्यांना संपर्क साधून चंद्र दर्शन बद्दल माहिती मिळवली आहे ईद उल फित्र रमजान उध्या बुधवारी करण्याचा निर्णय घेतला आहे.मंगळवारी सौदी अरेबिया सह आखाती देशात ईद साजरी झाली आहे.

ramjaan eid bgm

 belgaum

अंजुमन हॉल शेजारील ईदगाह मध्ये बुधवारी सकाळी 9 :30 वाजता सामूहिक नमाज पठण होणार आहे.आजच्या बैठकीत मुफ्ती मंजूर मिस्बाई,मुफ्ती अब्दुल अजीम, माजी आमदार फिरोज सेठ ,राजू सेठ आदी उपस्थित होते. गेले माहिना भर पासून रोजे उपवास ठेवण्यात येत होता आज शेवटचा उपवास(रोजा) होता उद्या बुधवारी 5 जून रोजी रमजान ईद साजरी होणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.