बेळगावचे सुपुत्र आणि सध्या कारवार येथे डीएसपी म्हणून सेवा बजावत असलेले शंकर मारिहाळ यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे.
नवी दिल्लीत सात जुलै रोजी सकाळी अकरा वाजता राष्ट्रपती भवन येथे राष्ट्रपतींच्या हस्ते पदक प्रदान केले जाणार आहे.शंकर मारिहाळ हे पोलीस सेवेत १९९४ मध्ये दाखल झाले.
म्हैसूर येथे त्यानी प्रशिक्षणार्थी फौजदार म्हणून सेवा बजावली.नंतर बेळगाव आणि अन्य ठिकाणी त्यांनी सेवा बजावली आहे.एक प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ते ओळखले जातात.अनेक गुंतागुंतीच्या प्रकरणांचा त्यांनी तपास करून गुन्हेगारांना जेरबंद केले आहे.