Saturday, January 25, 2025

/

दर्शन रायडर्स ठरला येळ्ळूर प्रीमियर लीगचा विजेता

 belgaum

दर्शन रायडर्स या संघाने शिवाजी पार्क संघाला पराभूत करत आठवी येळ्ळूर प्रीमियर लीग स्पर्धा जिंकली. गेले 11 दिवस दररोज रात्री प्रकाश झोतात या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यात येळ्ळूर गावच्या 14 संघांनी सहभाग दर्शवला होता.

Ypl
या स्पर्धेचे बक्षीस वितरण येळ्ळूर जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल,प्रकाश पम्मार,शिवसेनेचे बेळगाव जिल्हा उपाध्यक्ष सुनील पाटील, डॉ विराज पाटील, विजय पाटील ग्राम पंचायत सदस्य राजू पावले, यांच्या हस्ते करण्यात आले.

येळ्ळूर येथे येळ्ळूर प्रिमियर लीग(ypl) ही स्पर्धा गेली आठ वर्षे ही स्पर्धा गाव मर्यादित आयोजित करण्यात येत आहे.. गावातील युवक व्यसनापासुन दुर रहावेत व गावात एकी निर्माण करण्यासाठी तसेच येळ्ळूर मधील क्रिकेट जिवंत ठेवण्यासाठी आम्ही ही स्पर्धा भरवत आहोत अशी माहिती आयोजक राज उघाडे यांनी बेळगाव live कडे बोलताना दिली.स्वामी विवेकानंद सोसायटीने या स्पर्धेचे मुख्य प्रायोजकत्व स्वीकारले होते.

 belgaum
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.