रामकृष्ण मिशन आश्रमातर्फे अथणी तालुक्यातील पाणी टंचाई असलेल्या सहा गावांना नियमित पाणी पुरवठा टँकरद्वारे केला जात आहे. अथणी तालुक्यात उदभवलेली पाणी टंचाई पाहून जिल्हा प्रशासनातर्फे देखील काही गावामध्ये टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.
अथणी तालुक्यातील अनंतपूर, शिरूर,पांडेगाव ,संबरगी,अजूर आणि जम्बगी गावात रामकृष्ण मिशन आश्रमातर्फे टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे.
अनंतपूर गावाला दररोज १४००० लिटर,शिरूर गावाला १४००० लिटर,पांडेगावला १४००० लिटर,संबरगीला २४००० लिटर,अजूरला १०००० लिटर आणि जम्बगी गावाला १५००० लिटर पाणी दररोज पुरविले जात आहे.एकूण २९२०० लोकसंख्येला ९१०००लिटर पाणी रामकृष्ण मिशन आश्रमातर्फे दिले जात आहे.