दहावीच्या पुनर्रमूल्यांकनात रोशनी तेजस्वी तीर्थहळ्ळी या डी पी स्कुलच्या विद्यार्थिनीने कर्नाटक राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला असून तिचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.दहावीच्या परीक्षेत रोशनीला ६२५ पैकी ६२४ गुण मिळाले आहेत.
पहिलेंदा दहावीचा निकाल लागला त्यावेळी तिला ६२२ गुण मिळाले होते आणि कर्नाटक राज्यात ती चौथी आली होती.तिला आणखी गुण मिळण्याची खात्री होती म्हणून तिने पुनर्रमूल्यांकनासाठी मागणी केली होती.त्यानुसार पुनर्रमूल्यांकन केल्यावर तिच्या गुणात आणखी दोन गुणांची वाढ झाली.
दहावीच्या परीक्षा मंडळाने गुण वाढ झाल्याबद्दल तिला कळवले आहे.रोशनीला आजवर अनेक पुरस्कार आणि बक्षिसे मिळाली आहेत.रोटरीचा बेस्ट स्टुडंट अवॉर्ड,राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत पुरस्कार असे अनेक मानसन्मान शालेय जीवनात तिला लाभले आहेत.निवृत्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.टी एल श्रीनिवास यांची ती नात असून कन्नड विषयाचे मार्गदर्शन रोशनीने त्यांच्याकडून घेतले होते.रोशनीची आपल्या वडीलाप्रमाणे नेत्रातज्ञ होण्याची मनीषा आहे.