Wednesday, April 17, 2024

/

168 मराठा जवान देशसेवेत रुजू

 belgaum

आज झालेल्या शानदार शपथविधी सोहळ्याने मराठा लाईट इन्फन्ट्री चे 168 जवान देशसेवेत रुजू झाले आहेत. कॅप्टन अभिनव राय यांच्या व रेक्ट अशोक वंदाडी यांच्या नेतृत्वाखालील परेडने शानदार शपथविधी सोहळा झाला.
ब्रिगेडियर गोविंद कलवाड यांनी परेड मध्ये मानवंदना स्वीकारून तरुण जवानांना देशसेवेची शपथ दिली. रेजिमेंट आणि देशाचा तिरंगा अशा दोन ध्वजांना साक्ष ठेऊन ही शपथ देण्यात आली.
रेजिमेंट च्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण ठेऊन देशसेवा करा. प्रशिक्षणाची साक्ष ठेऊन सैनिक असल्याचा अभिमान बाळगा असे उद्गार त्यांनी काढले.

Mlirc

प्रशिक्षणार्थी जवान रिषभ पाटील,ज्ञानेश्वर करळी, अक्षय भोसले,दीपक सोमसे यांना वेगवेगळ्या क्षेत्रात कामगिरी बजावल्या बद्दल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी प्रशिक्षित जवानांचा दीक्षांत समारंभ होताच सीमेवर हुतात्म्य पत्करलेल्या जवानांना अभिवादन करण्यात आले तीन वीर नारी यांचा देखील सत्कार करण्यात आला.
प्रशिक्षण काळात चांगली कामगिरी केलेल्या जवानांना पदके देऊन गौरवण्यात आले. यावेळी लष्करी जवान, अधिकारी आणि पालक उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.