रोटरी क्लब ऑफ बेळगाव ला रोटरी इंटरनॅशनल कडून पुरस्कार मिळाला आहे. रोटरी फाउंडेशनला 2017 18 या काळात सर्वाधिक निधी मिळवून दिल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला आहे. एक लाख सहा हजार चारशे डॉलर म्हणजेच 72 लाख 50 हजार रुपये क्लबने रोटरी फाऊंडेशनला दिले होते. रोटेरियन सचिन बिच्छू यांच्या अध्यक्षतेखाली हा निधी जमवून देण्यात आला होता, याबद्दल सचिन बिच्छू यांनासुद्धा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. त्याचबरोबर मागील अध्यक्ष शरद पै, राजू पोतदार यांनासुद्धा रोटरी फाउंडेशन साठी निधी दिल्याबद्दल सन्मानित करण्यात आले आहे.

रोटरीचे अधिकारी आनंद कुलकर्णी यांच्या हस्ते जिल्हास्तरीय कार्यक्रमात डॉ बी एस जिरगे सभागृहामध्ये आयोजित कार्यक्रमात हे पुरस्कार देण्यात आले. रोटरी फोंडेशन चे ट्रस्टी गुलाम वाहनवटी, जिल्हा प्रांतपाल रविकिरण कुलकर्णी, भावी प्रांतपाल गिरीश मसुरकर, रोटरी रिजनल फाऊंडेशन कॉर्डिनेटर अविनाश पोतदार हे मान्यवर उपस्थित होते,
रोटेरियन संदीप नाईक सतीश नेतलकर नितीन शिरगुरकर यांनी प्रत्येकी दहा हजार डॉलर दिल्यामुळे त्यांचीही दखल पुरस्कारासाठी घेण्यात आली. हॅप्पी स्कूल प्रोजेक्ट साठी एकस ने $30000 निधी दिला होता त्यांचाही गौरव झाला . सर्व रोटरी क्लबचे सदस्य यावेळी उपस्थित होते.




