शहर गुन्हा अन्वेषण पोलिसांनी शहरातील ध. संभाजी उद्याना जवळ क्रिकेट वर बेटिंग लावणाऱ्या सहा सट्टेबाजांना अटक करून त्यांच्या पाच मोबाईल सह एक लाख 80 हजार जप्त केले आहेत.
राहुल मननूरकर रा.कपिलेश्वर रोड बेळगाव अभिषेक पाटील रा. कुलकर्णी गल्ली,विजय दद्दीकर रा.जेड गल्ली शहापूर,जावेद अरकाटे रा.पंजीबाबा शिवाजीनगर,अश्रफ बँकांपुर रा. शिवाजीनगर, तौसिफ मकानदार रा.शिवाजीनगर बेळगाव अशी या सट्टेबाजांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आय पी एल मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्या सामन्यात महाद्वार रोड जवळील संभाजी उद्यान परिसरात सदर सट्टेबाज ग्रुप करून सट्टा जुगार लावत होते यावेळो पोलीसांनी धाड टाकून त्यांना अटक केली त्यांच्या जवळील मोबाईल आणि रोख रक्कम जप्त केली.गुन्हा शाखेचे ए सी पी महंतेश जिद्दी आणि मार्केट ए सी पी एन व्ही भरमनी यांच्या नेतृत्वाखाली सदर कारवाई करण्यात आली.या प्रकरणी मार्केट पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.