सी आर पी एफ चे आय जी पी डॉ टी सेकर यांच्या मार्गदर्शनाखाली को स्कूल फॉर जंगल वॉरफेअर अँड टेक्टिक्स(कोब्रा जंगल शाळा युद्ध आणि तंत्र) आणि सेंट्रल रिजर्व पोलीस फोर्स(सी आर पी एफ)बेळगाव स्थापना दिवस कार्यक्रमाचे आयोजन कऱण्यात आले होते.
खानापूर तालुक्यातील तोराळी येथे 408 एकर जमिनीत पसरलेल्या ट्रेनिंग सेंटर मध्ये 2012 पासून सी आर पी एफ च्या जवानांना कोब्रा जंगल शाळा युद्ध आणि तंत्र याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. नक्षलवाद्यांशी लढा देत तैनात जवानांना जंगल युद्ध तंत्रज्ञान या बद्दल विशेष प्रशिक्षण देण्यात येत आहे.
यावेळी प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य आय जी पी टी सेकरा यांनी कवाटर गार्ड मध्ये आयोजित कार्यक्रमात हुतात्म्यांना श्रद्धांजली वहात अभिवादन केले. यावेळी सैनिक संमेलनाचे देखील आयोजन करण्यात आले होते. जवान व अधिकाऱ्यां साठी सायंकाळी च्या सत्रात बास्केट बॉल खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम आणि मेजवानी आयोजित करण्यात आली होती.
तोराळी ग्रामस्थ विविध खात्यांचे अधिकारी यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी असलेले केंद्रीय विद्यालय 2 विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी कॅम्प मध्ये नवीन एस बी आय ए टी एम देखील सुरू करण्यात आले.