कोच राहुल द्रविड यांच्या नेतृत्वाखालील भारतीय अ संघ बेळगावात दाखल झाला आहे.आगामी 25 मे पासून भारत आणि श्रीलंका अ संघा दरम्यान हुबळी आणि बेळगावात दोन चार दिवसीय आणि पाच एक दिवसीय सामने होणार आहेत.
ऑटो नगर मधील केएस सी ए मैदानावर शनिवार तारीख 25 पासून होणाऱ्या भारत व श्रीलंका यांच्यातील एकमेव चार दिवस कसोटी सामन्याची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात असून दोन्ही संघांनी संघांचे बेळगावात आगमन झाले आहे अशी माहिती कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेचे बेळगाव समन्वयक अविनाश पोतदार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले या अगोदर या मैदानावर तीन रणजी सामने भारत-बांगलादेश महिलांचे टी-20 सामने राष्ट्रीय अकादमीच्या 19 वर्षाखालील लढती झाल्या आहेत. भारत व दक्षिण आफ्रिका मालिका पावसामुळे रद्द करावी लागली हे कसोटी एकदिवसीय मालिकेसाठी संपूर्ण मैदान हिरवेगार करण्यात आले आहे दक्षिण विभाग चे मुख्य क्युरेटर श्रीराम यांच्या देखरेखीखाली मुख्य खेळपट्टीचे काम प्रगतिपथावर आहे मैदानावर इलेक्ट्रॉनिक स्कोर बोर्ड बसवण्यात आला आहे.बेळगावातील सामना प्रेक्षकांना मोफत असून अ प्रवेश द्वारातून खेळाडू महनीय व्यक्ती पत्रकार डॉक्टर अग्निशामक दल व पोलिसांना प्रवेश तर ब प्रवेश द्वारातून प्रेक्षकांना प्रवेश आहे. या भारतीय संघासोबत भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड लेग स्पिनर नरेंद्र हिरवाणी हेही उपस्थित राहणार आहेत त्या प्रसंगी बीसीसीआयचे धारवाड विभागाचे समन्वयक बाबा पुसद दीपक पवार उपस्थित होते.
भारत-दक्षिण आफ्रिका सामना पावसामुळे रद्द झाल्याने आगामी श्रीलंका मालिकेसाठी सुपर मैदान झाकण्यासाठी अच्छादन मुखेड व्यवस्था करण्यात आली आहे य अच्छादना मुळे या सामन्यावेळी पावसाचा फरक पडणार नाही.
आंतरराष्ट्रीय सामन्याची संधी :बाबा पुसद
बेळगावच्या के एस सी ए मैदानावर अल्पावधीतच आंतरराष्ट्रीय सामन्याचे आयोजन करण्याचा मान मिळाला यासाठी के एस सी ए यांच्यावतीने सर्वतोपरी सहकार्य लाभेल. बंगळूर नंतर धारवाड विभागाची क्रिकेटमध्ये प्रगती होत आहे बीसीसीआयकडून निधी मंजूर झाला तर संपूर्ण मैदानाचा कायापालट होईल यासाठी थोडा वेळ लागेल बीसीसीआयचे सहकार्य राहील.
धारवाडचे बाबा पुसद अविनाश पोतदार यांच्या अथक परिश्रमामुळे नेटक्या नियोजनामुळे बीसीसीआयने बेंगलोर म्हैसूर हुबळी बेळगाव या ठिकाणी लक्ष केंद्रित केले आहे अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सामने आयोजित करण्यासाठी विश्वास दाखविला आहे.
आयपीएल खेळाडूंची धूम
श्रीलंकेच्या मालिकेसाठी भारतीय संघात नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल स्पर्धेत पडलेल्या खेळाडूंची धुम असणारे हे खेळाडू प्रामुख्याने अंकित राजपूत, संदीप वॉरियर्स, राहुल जयवंत यादव सिद्धेश लाड अनमोल प्रीतसिंह इशांत किशन शुभम श्रीलंकेचा अकेला धनंजय यांचा खेळ बेळगावकर क्रिकेट रसिकांना पाहायला मिळणार आहे.