बेळगाव लोकसभा मतदार संघात चौथ्यांदा खासदार बनलेले सुरेश अंगडी यांची मोदींच्या मंत्री मंडळात वर्णी लागणार आहे.
कर्नाटक राज्याच्या लिंगायत कोट्यातून अंगडी हे मंत्री होणार आहेत.गुरुवारी दुपारी अंगडी यांना सायंकाळी होणाऱ्या मंत्रिमंडळात शपथविधी साठी पी एम ओ मधून अधिकृत रित्या फोन आला आहे.अंगडी व्यतिरिक्त कर्नाटकातून प्रहलाद जोशी, सदानंद गौडा देखील मंत्री होणार आहेत.
माजी मंत्री बी शंकरांनंद आणि बाबगौडा पाटील यांच्या नंतर अंगडी हे बेळगावचे तिसरे खासदार असतील ते केंद्रीय मंत्री बनत आहेत.अंगडी यांना कॅबिनेट मंत्री की राज्य मंत्री पद मिळेल हे अजून ठरलेलं नाही.
या वेळी अंगडी यांनी काँग्रेसच्या व्ही एस साधूंनावार यांचा 3 लाख 91 हजार मतांनी पराभव केला होता.बेळगाव तालुक्यातील के के कोप्प जवळील नागेरहाळ या गावचे मूळचे रहिवासी असलेले अंगडी वकील असून ते मंत्री बनत आहेत.संभावित मंत्र्यांना मोदी यांनी चहाला बोलावले आहेत.