बेळगावचा सुपुत्र निखिल निपाणीकर हा बिहार मधील प्रसिद्ध जिल्हा बेगुसरायचा डी सी बनला आहे.बिहार सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने 7 मे रोजी एक अधिसूचना जाहीर केली असून आय ए एस अधिकारी निखिल निपाणीकर याची बेगुसराय च्या जिल्हाधिकारी(डी एम)पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
बेगुसराय हे शहर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत देशभरात चर्चेत आहे कारण या बेगुसराय या लोकसभा मतदार संघातून युवा कार्यकर्ते कनैय्या कुमार यांनी सी पी आय पक्षातून निवडणूक लढवली होती तर भाजपातून गिरीराज सिंह रिंगणात होते.कनैय्या कुमार यांच्या मुळे हे शहर देशभरात निवडणुकीत चर्चेत आले होते याच जिल्ह्याचा डी सी (डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट) बनण्याचा मान निखिलला मिळाला आहे.
बेळगावचा सुपुत्र निखिल हा 2017 ची यु पी एस सी स्पर्धा परीक्षा 563 क्रमांकाने उत्तीर्ण झाला होता.महानगरपालिका अधिकारी लक्ष्मी निप्पाणीकरांचा तो भाचा आहे 2018 साली आय ए एस मिळाले आहे.
तो सेंट पॉल्स शाळेचा विध्यार्थी असून सीईटी परीक्षेत पहिला येऊन त्याने इंजिनिअरिंग पूर्ण केले आहे. त्याला प्रशासकीय सेवेत काम करण्याची इच्छा होती यामुळे यूपीएससी परीक्षेला बसला आणि आय ए एस बनला आहे.