हलगा मच्छे बायपास रोडसाठी सुपीक जमीन संपादन करण्यास पुन्हा एकदा विरोध करत वडगांव परिसरातील शेतकऱ्यांनी विरोध करत बैलगाडी मोर्चा काढत जिल्हाधिकारी कार्यालयास घेराव घातला होता ठिय्या आंदोलन केले होते.
डी सी ऑफिस गेट समोर ठिय्या आंदोलन करत शेतकऱ्यांनी घोषणा बाजी करत हलगा मच्छे बायपास रद्द करा अशी मागणी केली.
कालच शहापूर शिवार सर्वे नं 145,147/1 मध्ये उभ्या पिकांवर बुलडोझर फिरवला होता जमीन संपादनास विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसी दडपशाही केली होती त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी डी सी ऑफिस समोर आंदोलन करत घोषणाबाजी केली.
पालकमंत्री सतीश जारकीहोळी आणि महसूल मंत्री आर व्ही देशपांडे देखील या मोर्चाला सामोरे गेले देशपांडे यांनी यावर बैठक बोलवू असे आश्वासन दिले आहे.भर उन्हात दोन तास हुन अधिक काळ शेतकऱ्यांनी डी सी ऑफिस गेट समोर आंदोलन करत सुपीक जमीन संपादनाचा निषेध केला.
गळ्यात फास लाऊन घेत शेतकऱ्यांनी आंदोलन करत या भागातील लोक प्रतिनिधी केवळ मते मागायला येतात आता कुठं गेलात आम्हाला न्याय द्या असा प्रश्न देखील उपस्थित केला.