Tuesday, June 25, 2024

/

बेळगावात महिलांच्या प्रसाधनगृहात हिडन कॅमेरा

 belgaum

टिळकवाडी येथील बीपीओ मधील महिलांच्या प्रसाधनगृहात कॅमेरा आढळल्याने खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.सफाई कामगार नेहमीप्रमाणे प्रसाधनगृह स्वच्छ करत असताना वर बसविलेला कॅमेरा धक्का लागून खाली पडला.

कॅमेरा पडल्यावर सफाई कामगार महिला घाबरली आणि तिने अन्य महिला कामगारांना याची माहिती दिली.ही घटना परदेशात असणाऱ्या मालकाला कळविल्यावर त्याने बेळगावला धाव घेतली.

Hidden Camera

 belgaum

बेळगावला आल्यावर मालकाने व्यवस्थापकाची हलगर्जीपणा बद्दल हजेरी घेतली आणि पोलिसात घडल्या प्रकारची तक्रार दाखल केली.पोलीस आयुक्तांनी याची गंभीर दखल घेऊन तक्रारीचा तपस सुरु केला असून या प्रकारामुळे मात्र खळबळ उडाली आहे.या संबंधी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.