बेळगाव शहरा साठी ब्रेकिंग न्यूज आहे हवामान खात्याने ही ब्रेकिंग दिली आहे.
हवामान खात्याने आत्ता तातडीने कारवार, बेळगाव, गदग, कोप्पळ, रायचूर,बागलकोट, शीमोगा, हसन, चामराजनगर, तुमकुर, चित्रदुर्ग आणि बल्लारी च्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्रे मेल केली आहेत,येत्या तीन तासात वादळी वारे आणि पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून खबरदारी घेण्याची सूचना करण्यात आली आहे.
30 ते 40 किलो मीटर पर तास या वेगाने वारे वाहून हा पाऊस पडणार असून काळजी घ्यावी अशी सूचना करण्यात आली आहे.
मागील चार दिवसांपासून बेळगाव शहर व जिल्ह्यात वादळी वारा व पाऊस सुरू असून यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे, यातच हा हाय अलर्ट आला असल्याने आता जिल्हा प्रशासन काय काळजी घेणार याकडे नजर आहे.
शनिवारी झालेल्या पावसानंतर असंख्य झाडे पडून मोठे नुकसान झाले होते, आता आज पाऊस कसा होणार हे माहीत नसले तरी आधीच सूचना मिळाल्याने नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे